Apple ने भारतात आपला नवीन हँडसेट iPhone 16e मॉडेलला लाँच केले आहे. कंपनी लवकरच iPhone SE 4 लाँच करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, कंपनीने iPhone SE 4 ऐवजी स्वस्त iPhone 16e मॉडेलला सादर केले आहे. कंपनीने ग्राहकांसाठी कमी किंमतीत येणारे iPhone 16 सीरिजमधील नवीन मॉडेल उपलब्ध करून दिले आहे. या फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
iPhone 16e ची किंमत
Apple ने iPhone 16e चे बेस 128GB व्हेरिएंटची अमेरिकेत $599 (अंदाजे 49,500 रुपये) किंमतीत लाँच आहे. तर भारतात या मॉडेलची किंमत 59,900 रुपये आहे. iPhone 16e च्या 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,900 रुपये आहे, तर 512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 89,900 रुपये मोजावे लागतील. नवीन iPhone 16e साठी प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर डिलिव्हरी 28 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
iPhone 16e चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 16e मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले असून, यात फेस आयडी सिस्टीमसाठी नॉच देण्यात आला आहे. स्क्रिनचे रिझॉल्यूशन 2532×1170 पिक्सल, ब्राइटनेस 1200 निट्स ब्राइटनेस आहे. नॉच सुरक्षित फेसियल रिकॉग्निशन प्रदान करते. या फोनमध्ये पारंपरिक म्युट स्विचऐवजी अॅक्शन बटण देण्यात आले आहे.
अॅक्शन बटणाच्या मदतीने युजर्स कॅमेरा सुरू करणे किंवा ‘डू नॉट डिस्टर्ब’ मोड सुरू करू शकतात. याशिवाय, Apple ने iPhone 16e मध्ये USB-C पोर्ट देखील दिला आहे. ॲपलच्या iPhone 16e मध्ये A18 चिप दिली आहे. फोन आयओएस 18 वर काम करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ड्युअल सिम, वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.3, रीडर मोड सह NFC, GPS, ग्लोनास, गॅलीलियो, QZSS आणि BeiDou सारखे फीचर्स दिले आहेत. iPhone 16e मध्ये Apple Intelligence सपोर्ट दिला आहे, जे AI-आधारित फिचर्सचा संप्रदान करते. यामध्ये Genmoji, Writing Tools, आणि ChatGPT इंटिग्रेशन यांसारखी टूल्स दिले आहेत.iPhone 16e मध्ये फोटोग्राफीसाठी 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.