हा समुद्रकिनारा दिवसा स्वर्गाहून सुंदर दिसत असला तरी रात्री मात्र सैतानाचा नरक बनतो. इथे दिवसभर लोकांची प्रचंड गर्दी असते पण सूर्य जसजसा मावळू लागतो तसतसे लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किनारा सोडून पळ काढतात. काळोख होताच इथे विचित्र घटना घडू लागतात….या समुद्र किनाऱ्यावर अदृश्य शक्तींचा वास आहे असे म्हणतात. इथे रात्री गेलेला माणूस कधी पुन्हा परतलाच नाही.गुजरातच्या सुरतमधील या सैतानी समुद्रा किनाऱ्याचे नाव आहे डुमास…
डुमास समुद्रकिनाऱ्यावर शेकडो वर्षांपूर्वी मृतांना इथे समुद्राच्या साक्षीने अग्नी दिला जायचा. म्हणून आजही या किनाऱ्यावर मोक्ष न मिळालेले प्रेत-आत्मा रात्री भटकतात असे मानले जाते. या समुद्रकिनारा काळ्या वाळूने बनलेला आहे…स्थानिक लोककथांनुसार या काळ्या वाळूचे अस्तित्व मृतांना जाळून तयार केलेल्या राखेमुळे आहे असे म्हणतात. या कथांनुसार डुमासच्या किनाऱ्यावर असणारी वाळू आधी पांढऱ्या रंगांचीच होती, परंतु शवाची राख झाल्यानंतर ती या वाळूत मिसळत गेली आणि तिचा रंग गडद होत गेला.
हा समुद्रकिनारा संध्याकाळनंतर स्वतःचे रूप बदलू लागतो. रात्र होताच इथल्या भयाण शांततेत किळसवाणे रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येऊ लागतात… समु्द्रकिनाऱ्यावर एकही माणूस नसताना मोठ्याने हसण्याचे आवाज ऐकू येतात आणि मग विचित्र सावल्यांचा खेळ सुरु होतो….चंद्र दिसला की इथली कुत्री विचित्र आवाजात ओरडायला लागतात…कुत्रांच्या रडण्याचे-किंचाळण्याचे आवाज सुरू केले की किनाऱ्याच्या आसपास असणारे लोकही आपापल्या घरी परतात. त्यानंतर उजाडेपर्यंत कोणी इथे साधे फिरकतही नाही कारण, इथे आलेला माणूस घरी परत येत नाही. या परिसराच्या आसपासचा वारा मृतात्म्यांनी भरलेला आहे असे म्हटले जाते.