संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

Lagnam Spintex च्या शेअरने गुंतवणूकदारांना दोन महिन्यात केले मालामाल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

उच्च दर्जाचे सुती धागे तयार करणारी Lagnam Spintex कंपनीने गुंतवणूकदारांना दोन महिन्यात मालामाल केले आहे. या कंपनीचा शेअर 30 नोव्हेंबर 2021 रोजी NSE वर 47.20 च्या पातळीवर व्यवहार करत होता. मंगळवार, 9 फेब्रुवारी रोजी हा शेअर 94.45 रुपयांवर होता. त्यामुळे बाजारातील तज्ज्ञ सध्या या शेअरच्या वाढीच्या क्षमतेवर लक्ष ठेवून आहेत.

आगामी काळात या कंपनीचा स्टॉक आणखी वाढणार असल्याचे म्हंटले जात आहे. कारण कंपनीने 218 कोटी रुपयांची कॅपेक्स योजना आणली आहे. त्यामुळे या कंपनीची वार्षिक विक्री 300 कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा शेअर 115 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

या कंपनीने उत्पादन वाढवले तर दररोज 70 टन सुत तयार करू शकणार आहे. यामुळे कंपनीला नफा तसेच विक्री वाढण्यास मदत होईल, जे शेवटी गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami