Shreyas Iyer: शतक हुकले, तरीही चेहऱ्यावर हास्य…श्रेयसने मोडला विराटचा मोठा विक्रम

Iyer

Shreyas Iyer record in IPL | IPL 2025 मधील 5व्या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सचा (IPL 2025 GT vs PBKS) 11 धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) नाबाद 97 धावांची वादळी खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, श्रेयसला आयपीएलमधील (IPL 2025) पहिले शतक ठोकता आले नाही. असे असले तरीही श्रेयसच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. यासोबतच, त्याने विराट कोहलीच्या नावावर असलेला एक मोठा रेकॉर्ड देखील मोडला आहे.

कर्णधार म्हणून सर्वाधिक सामन्यात विजय मिळवण्याचा विराटचा (Virat Kohli) रेकॉर्ड श्रेयसने मोडला आहे. श्रेयस पहिल्यांदाच पंजाबचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबने विजय मिळवत आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवात केली.

विराटचा रेकॉर्ड मोडला

गुजरातविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर अय्यर कर्णधार म्हणून 70 सामन्यांनंतर सर्वाधिक विजय मिळवणारे दुसरा कर्णधार बनला आहे. त्याने यासह विराट कोहलीचा विक्रम मोडला. विराटने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या 70 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून 37 सामने जिंकले होते. तर आता अय्यरने 70 सामन्यांमध्ये कर्णधार असताना एकूण 41 विजय मिळवले आहेत. 

आयपीएलमध्ये 70 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितने पहिल्या 70 सामन्यांपैकी 43 सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. तसेच, धोनीनेही कर्णधार म्हणून 70 सामन्यांनंतर 41 सामने जिंकले आहेत.

शतक हुकले, पण संघाचा विजय

गुजरातविरुद्धच्या सामन्यात पंजाबने पहिल्यादा फलंदाजी करत 5 विकेट्स गमावत 243 धावा केल्या. पंजाबकडून श्रेयस अय्यरने 42 चेंडूत नाबाद 97 धावांची वादळी खेळी केली. तर त्याच्यासोबत शशांक सिंगने अवघ्या 16 चेंडूत नाबाद 44 धावा केल्या. पंजाबच्या शेवटच्या ओव्हरमध्ये श्रेयसला फलंदाजीची करण्याची संधीच मिळाली नाही, त्यामुळे त्याचे शतक थोडक्यात हुकले. असे असले तरीही संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा ठरला.