KL Rahul Ignores Goenka | आयपीएल 2025 (IPL 2025) च्या 40व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) 8 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात अर्धशतक झळकावून दिल्लीच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) सामना संपल्यानंतर लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांच्याशी बोलणे टाळताना दिसला.
गेल्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार असलेल्या केएल राहुलचे संघाचे मालक संजीव गोयनका यांच्याशी संबंध चांगले नव्हते. संघाच्या खराब कामगिरीमुळे गोयनका आणि राहुल यांच्यात वाद झाले होते. याच कारणामुळे राहुलने यंदाच्या आयपीएल हंगामासाठी स्वतःला लिलावात मुक्त केले होते. त्यामुळे, दिल्ली आणि लखनऊ यांच्यातील या सामन्यात राहुलच्या कामगिरीसोबतच गोयंका यांच्यासोबतच्या त्याच्या भेटीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते.
दिल्लीच्या विजयानंतर खेळाडू हस्तांदोलन करत असताना, केएल राहुल आणि संजीव गोयंका यांचा समोरासमोर सामना झाला. राहुलने गोयंका यांच्याशी औपचारिकपणे हात मिळवला आणि तत्काळ पुढे निघून गेला. संजीव गोयंका राहुलशी काहीतरी बोलू इच्छित होते, पण राहुल थांबवला नाही आणि तो पुढे गेला. राहुलचे हे वर्तन पाहून गोयंका आश्चर्यचकित झाले. राहुलच्या या कृतीला मागील वर्षातील घटनेचा बदला म्हणून पाहिले जात आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Rahul walking away from goenka 🤣🤣😂#klrahul #goenka #ipl #LSGvsDC pic.twitter.com/Wke8kOyoHf
— SarpanchSaab (@kitts1727) April 22, 2025
राहुलने केवळ गोयंका यांनाच नव्हे, तर त्यांच्या मागे उभे असलेले त्यांचा मुलहा शाश्वत यालाही दुर्लक्षित केले. एलएसजीच्या मालक पिता-पुत्रांनी राहुलला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण माजी कर्णधार राहुल बोलण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता.
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला आठ विकेट्सने पराभूत केले. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने 17.5 षटकांत 2 विकेट्स गमावून 161 धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले. दिल्लीसाठी लोकेश राहुलने नाबाद 57 तर अभिषेक पोरेलने 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. लखनऊसाठी एडन मारक्रमने दोन्ही विकेट्स घेतले.