Karun Nair : करुण नायरचे वादळी पुनरागमन! तब्बल 2520 दिवसांनी IPL मध्ये झळकावले अर्धशतक

Karun Nair IPL Comeback

Karun Nair IPL Comeback | दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) फलंदाज करुण नायरने (Karun Nair) आयपीएल 2025 च्या 29 व्या सामन्यात (IPL 2025) धमाकेदार पुनरागमन करत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध केवळ 40 चेंडूंमध्ये 89 धावांची जबरदस्त खेळी साकारली. मात्र त्याची ही झुंजार कामगिरी संघाच्या पराभवापासून वाचवू शकली नाही. परंतु, करूणच्या या खेळीची सर्वत्र चर्चा होत आहे.

2520 दिवसांनी T20 मध्ये अर्धशतक

2022 नंतर प्रथमच आयपीएलमध्ये उतरलेला नायरने पुनरागमनातच अर्धशतक झळकावत ऐतिहासिक विक्रम केला. त्याने आयपीएलमध्ये 2520 दिवसांच्या अंतराने अर्धशतका करण्याचा नवा विक्रम केला. याआधी हा विक्रम ट्रॅव्हिस हेड (Travis Head) याच्या नावावर होता, ज्याने 2017 ते 2024 दरम्यान 2516 दिवसांचे अंतर राखले होते.

करुण नायरने IPL 2018 मध्ये पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाकडून शेवटचे अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर 2019 मध्ये 1, 2020 मध्ये 4 आणि 2022 मध्ये 3 सामने खेळून तो संघातून बाहेर गेला होता. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघासाठी सातत्याने धावा केल्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली.

मिळालेल्या संधीचे सोने करत करूणने वादळी खेळी केली. त्याने अवघ्या 40 चेंडुंमध्ये 12 चौकार आणि 5 षटकरांच्या साहाय्याने 89 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी विजय

नायरच्या खेळीनंतरही दिल्ली कॅपिटल्साचा संघ 206 धावांचे लक्ष्य पार करू शकला नाही. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावत 205 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ सर्वबाद 193 धावांपर्यंतच मजल मारू शकला. मुंबईच्या कर्ण शर्मा (Karn Sharma) याला 4 षटकांत 36 धावांत 3 विकेट्स घेण्यासाठी सामनावीर घोषित करण्यात आले.