IPL 2025 : आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स एकमेकांना भिडणार? कुठे पाहता येईल सामना? 

IPL 2025 DC vs LSG | आयपीएलचा (IPL 2025) नवा सीझन सुरू झाला असून, अपेक्षेप्रमाणे क्रिकेट चाहत्यांकडून या स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेतील चौथा सामना आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) या संघांमध्ये पार पडणार आहे. 

हा सामना विशाखापट्टणममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सामना सुरू होईल, तर त्याआधी सायंकाळी ७ वाजता टॉस होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ-हॉटस्टार अ‍ॅपवर पाहता येईल.

यंदा दिल्लीच्या संघाचे नेतृत्व अक्षर पटेलकडे (Axar Patel) आहे.लखनौ संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी  ऋषभ पंतकडे आहे. दोन्ही संघांनी आपल्या संघात मोठे बदल केले आहेत, त्यामुळे हा सामना IPL चाहत्यांसाठी नक्कीच रोमहर्षक ठरणार आहे. 

दोन्ही संघातील मागील 5 सामन्यात लखनौने बाजी मारली आहे. 5 पैकी तीन सामन्यात लखनौचा तर 2 सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ (Delhi Capitals Playing 11)

अक्षर पटेल (कर्णधार), जेक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन.

इम्पॅक्ट प्लेयर : मोहित शर्मा, समीर रिझवी, करुण नायर

लखनौ सुपर जायंट्स संभाव्य संघ (Lucknow Super Giants Playing 11 )

ऋषभ पंत (कर्णधार), मिचेल मार्श, आर्यन जुयाल,  निकोलस पूरन, आयुष बदोनी, डेव्हिड मिलर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आकाश सिंग, शमर जोसेफ.

इम्पॅक्ट खेळाडू: अब्दुल समद, अर्शीन कुलकर्णी, प्रिन्स यादव