IPL 2025 Opening Ceremony: यंदा IPL चा उद्घाटन सोहळा असणार खास, हे सेलिब्रेटी करणार परफॉर्म

IPL 2025 Opening Ceremony | बहुप्रतिक्षित IPL 2025 स्पर्धेला येत्या शनिवारपासून (22 मार्च) सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहते आतुरतेने ही स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघात खेळला जाणार आहे. त्याआधी ईडन गार्डन्सवर ग्रँड उद्घाटन सोहळा (IPL 2025 Opening Ceremony) देखील पार पडणार आहे.

बीसीसीआयकडून आयपीएल 2025 (IPL 2025) च्या सुरुवातीच्या सामन्याआधी उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन सोहळ्यात अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत. रिपोर्टनुसार, या सोहळ्याला बॉलिवूड कलाकार शाहरुख खान, सलमान खान, विकी कौशल आणि श्रद्धा कपूर उपस्थित राहू शकतात. याशिवाय, अमेरिकन पॉप बँड वनरिपब्लिकला देखील परफॉर्म्ससाठी संपर्क करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, शाहरुख खान त्याचा संघ KKR च्या समर्थनासाठी उपस्थित राहणार आहे, तर सलमान खान ‘सिकंदर’ चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी येणार आहेत.  या ओपनिंग सेरेमनीमध्ये कॅटरिना कैफ, अनन्या पांडे, माधुरी दीक्षित, जान्हवी कपूर, करिना कपूर, पूजा हेगडे, आयुष्मान खुराना आणि सारा अली खान देखील होण्याची शक्यता आहे. अरिजीत सिंग, श्रेया घोषाल हे गायल देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करतील.

दरम्यान, 22 मार्चपासून आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी या संघात खेळला जाईल. स्पर्धेत एकूण 74 सामने खेळले जातील. अंतिम सामना 25 मे ला खेळला जाईल.