IPL 2025 SRH vs LSG | आज (27 मार्च 2025) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) 18 व्या हंगामातील सातवा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स (Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants) यांच्यात खेळला जाईल. हा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. हैदराबादच्या संघाने हंगामातील आपला पहिला सामना जिंकला आहे, तर लखनऊच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.
सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) हंगामातील आपल्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला 44 धावांनी पराभूत करत विजयी सुरुवात केली होती. तर, लखनऊ सुपर जायंट्सला (Lucknow Super Giants) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता.
आज हैदराबादचा संघ आपल्या विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तर लखनऊचा संघ मागील पराभव विसरून स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
हैदराबादच्या संघाचे नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे, तर लखनऊचे नेतृत्व आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत करणार आहे. हैदराबादने राजस्थानविरुद्ध 286 धावांचा डोंगर उभारला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात हैदराबात 300 धावांचा टप्पा गाठणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कधी व कुठे पाहता येईल सामना?
हैदराबाद आणि लखनऊ (SRH vs LSG) यांच्यातील हा सामना आज संध्याकाळी 7:30 वाजता हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल, तर टॉस सायंकाळी 7:00 वाजता होईल. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओहॉटस्टारवर पाहू शकता.
लखनऊ सुपर जायंट्सचा संघ : ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, कोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, राजवर्धन हंगरगेकर, रवीश अहमद, अकाश अहमद, रवीश अहमद, अकॅश बडोनी मणिमारन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव, दिग्वेश राठी.
सनरायझर्स हैदराबादचा संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, विआन मुल्डर, अभिषेक कुमार, मोहम्मद कुमार, शाह, मोहम्मद रेड्डी, नीतीश शर्मा, नीतीश शर्मा सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, एशान मलिंगा.