IPL 2025, SRH vs GT | इंडियन प्रीमियर लीग 2025 (IPL 2025) मधील 19 वा सामना आज (6 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात खेळला जाणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम (Rajiv Gandhi Stadium) येथे होणाऱ्या या सामन्याकडे दोन्ही संघांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या हंगामात हैदराबादच्या कामगिरीत सातत्य दिसून आलेले नाही. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांपैकी फक्त 1 सामन्यात विजय मिळवला आहे. मागील सामन्यात त्यांना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाकडून 80 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. याउलट, गुजरात टायटन्सची कामगिरी तुलनात्मकदृष्ट्या बळकट राहिली आहे. त्यांनी खेळलेल्या 3 सामन्यांपैकी 2 मध्ये विजय मिळवत गुणतालिकेत आपले स्थान मजबूत केले आहे. मागील सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघाला त्यांच्या होम ग्राउंडवर पराभूत केले होते.
आजच्या सामन्यात पॅट कमिन्स (Pat Cummins) हा हैदराबादचे नेतृत्व करेल, तर गुजरातच्या संघाचे नेतृत्व शुभमन गिल (Shubman Gill) करणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल, तर टॉस 7:00 वाजता होणार आहे.
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत IPL इतिहासात केवळ 5 वेळा टक्कर झाली आहे. यामध्ये गुजरातने 3 वेळा विजय मिळवला असून, हैदराबादला केवळ 1 विजय मिळवता आला आहे. उर्वरित 1 सामना अनिर्णीत राहिला होता.
सामन्याची माहिती
- संघ: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स (SRH vs GT)
- तारीख: 6 एप्रिल 2025
- ठिकाण: राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi Stadium, Hyderabad)
- वेळ: टॉस – 7:00 PM, सामना सुरू – 7:30 PM (IST)
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad Team) संघ:
पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, हर्षल पटेल, हेनरिक क्लासेन, कामिंडु मेंडिस, वियान मुल्डर, ईशान किशन (यष्टीरक्षक), अथर्व तायडे, सचिन बेबी, नीतीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, राहुल चाहर, अॅडम झम्पा, सिमरजीत सिंह, जीशान अंसारी, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा.
गुजरात टायटन्स (Gujarat Titans Team) संघ:
शुभमन गिल (कर्णधार), राशिद खान, साईं सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, जोस बटलर, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंगटन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, गेराल्ड कोएत्जे, आर साई किशोर, महिपाल लोमरोर, गुरनूर सिंह बरार, मोहम्मद अरशद खान, इशांत शर्मा, कुमार कुशाग्र, मानव सुथार, अनुज रावत, मानव सिंधू, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनत, कुलवंत खेजूरलिया.