IPL 2025, RR vs KKR | आयपीएल 2025 मधील 5 सामने आतापर्यंत पार पडले आहे. आज सहावा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) या संघामध्ये पार पडणार आहे. दोन्ही संघाना त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्त्वाचा असणार आहे.
राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादकडून आणि कोलकाता नाइट रायडर्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता या सामन्यात एक संघ विजय मिळवून विजयी घोडदौड सुरू करेल, तर दुसऱ्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागेल.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (IPL 2025, RR vs KKR) यांच्यातील विजय आणि पराभवाचा आकडा समान आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 30 सामने खेळले गेले आहेत. राजस्थानने 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर कोलकातानेही तेवढ्याच सामन्यांत विजय मिळवला आहे. दोन सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
संजू सॅमसन पहिल्या सामन्यात राजस्थानकडून इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याने शानदार कामगिरी केली. मात्र, सलामीवीर यशस्वी जैस्वालला मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे राजस्थानला विजय मिळवायचा असल्यास यशस्वीला मोठी खेळी करावी लागणार आहे. तर दुसरीकडे कोलकताच्या नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे आहे. अजिंक्य रहाणेने पहिल्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती. मात्र, बंगळुरूविरुद्ध संघाला विजय मिळवता आला नव्हता. आता राजस्थानविरुद्ध विजय मिळवत या स्पर्धेतील पहिल्या विजयीची नोंद करण्याचा प्रयत्न असेल.
कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्समधील (RR vs KKR Match) हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्नी+हॉटस्टारवर पाहता येईल. हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
कोलकाता नाइट राइडर्सचा संभाव्य संघ – जिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, अंगक्रिश रघुवंशी, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन, वरुण चक्रवर्ती.
राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ – रियान पराग (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, फजलहक फारुकी.