IPL 2025 | इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2025 मध्ये आज (8 एप्रिल) क्रिकेट चाहत्यांना दुहेरी लढतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. आज दोन महत्त्वपूर्ण सामने खेळवले जाणार असून, यामध्ये एक सामना पूर्वीच्या वेळापत्रकात बदल झाल्याने आजच्या दिवशी खेळवला जाणार आहे.
पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात दुपारी 3:30 वाजता ईडन गार्डन्स (Eden Gardens), कोलकाता येथे रंगणार आहे. यासाठी नाणेफेक 3 वाजता होईल. विशेष म्हणजे, हा सामना यापूर्वी रविवारी नियोजित होता, परंतु काही कारणास्तव त्याला आज हलवण्यात आले आहे.
दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात संध्याकाळी 7:30 वाजता मुल्लांपूर क्रिकेट स्टेडियम (Mullanpur Cricket Stadium) येथे खेळवला जाणार आहे. नाणेफेक 7 वाजता होईल.
सामन्यांची पार्श्वभूमी
कोलकाता आणि लखनऊ हे दोन्ही संघ आपापले मागील सामने जिंकून येत असल्याने ते आत्मविश्वासाने मैदानात उतरतील. कोलकाताने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा पराभव केला होता, तर लखनऊने बलाढ्य मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ला नमवले होते. त्यामुळे आजचा सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे.
KKR vs LSG – संघ
कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे, क्विंटन डी कॉक, रहमानुल्लाह गुरबाज, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंह, वेंकटेश अय्यर, रमणदीप सिंह, आंद्रे रसेल, एनरिक नॉर्किया, हर्षित राणा, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोड़ा, अनुकूल रॉय, मोइन अली, रोवमैन पॉवेल, मनीष पांडे, स्पेंसर जॉनसन, मयंक मारकंडे, लवनिथ सिसौदिया.
लखनऊ सुपर जायंट्स: ऋषभ पंत, डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, निकोलस पूरन, मिशेल मार्श, रवी बिश्नोई, अब्दुल समद, आर्यन जुयाल, आकाश दीप, हिम्मत सिंह, शाहबाज अहमद, आकाश सिंह, शमार जोसेफ, प्रिंस यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रीट्झके, एम सिद्धार्थ, दिग्वेश सिंह, आवेश खान, मयंक यादव, मोहसिन खान.
CSK vs PBKS – संघ
चेन्नई सुपर किंग्स: रुतुराज गायकवाड, महेंद्रसिंह धोनी, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, मथीशा पथिराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेवोन कॉनवे, सैयद खलील अहमद, रचिन रविंद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, सॅम कुरेन, शेख रशीद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, दीपक हुड्डा, गुरजनप्रीत सिंह, नाथन एलिस, जेमी ओवरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्णन घोष, श्रेयस गोपाल, वंश बेदी, आंद्रे सिद्दार्थ.
पंजाब किंग्स: श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मार्कस स्टोइनिस, निहाल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, विशाक विजयकुमार, यश ठाकूर, हरप्रीत बरार, विष्णु विनोद, मार्को यानसेन, लॉकी फर्ग्युसन, जोश इंगलिस, जेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, आरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्लाह उमरजई.
दोन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण Star Sports Network वर पाहता येणार असून, JioCinema App व वेबसाइटवर विनामूल्य थेट स्ट्रीमिंगची सुविधा उपलब्ध आहे.