IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2025) 18 व्या हंगामात आज चाहत्यांना क्रिकेटचा डबल हेडरचा आनंद मिळणार आहे. एका दिवसात दोन सामन्यांचा थरार अनुभवता येणार असून, पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात, तर दुसऱ्या सामन्यात जाब किंग्स (PBKS) आणि राजस्थान रॉयल्स (RR) आमनेसामने असतील.
दुपारी 3:30 वाजता सुरू होणारा पहिला सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगेल. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आजच्या सामन्याबाहेर राहू शकतो आणि अशा स्थितीत महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.
सायंकाळी 7:30 वाजता दुसरा सामना पंजाबच्या मुल्लांपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. दोन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर आणि लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema अॅपवर पाहता येईल.
IPL 2025 – आजचे सामने
17 वा सामना: चेन्नई सुपर किंग्स (CSK) vs दिल्ली कॅपिटल्स (DC)
- ठिकाण: एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
- टॉस: 3:00 PM | सामना सुरू: 3:30 PM
18 वा सामना: पंजाब किंग्स (PBKS) vs राजस्थान रॉयल्स (RR)
- ठिकाण: महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियम, मुल्लांपूर
- टॉस: 7:00 PM | सामना सुरू: 7:30 PM
IPL 2025 मधील संघांची आतापर्यंतची कामगिरी
- दिल्ली कॅपिटल्स (DC): 2 पैकी 2 सामने जिंकले – 100% विजय
- चेन्नई सुपर किंग्स (CSK): 3 पैकी 1 विजय, 2 पराभव
- पंजाब किंग्स (PBKS): 2 पैकी 2 विजय – शानदार सुरुवात
- राजस्थान रॉयल्स (RR): 3 पैकी 1 विजय, 2 पराभव
CSK vs DC – दोन्ही संघ
CSK संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (विकेटकीपर), सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी, वंश बेदी.
DC: अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), जेक फ्रेझर मॅकगर्क, करुण नायर, फाफ डुप्लेसिस, डोनोवन फरेरा, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिजवी, आशुतोष शर्मा, दर्शन नालकंडे, विपराज निगम, अजय मंडल, मनवंत कुमार एल, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, मिचेल स्टार्क, टी नटराजन, मोहित शर्मा, मुकेश कुमार, दुष्मंता चमीरा, कुलदीप यादव.
RR vs PBKS- दोन्ही संघ
RR: रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शुभम दुबे, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, युद्धवीर सिंह चरक, महीश तीक्षाना, क्वेना मफाका, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी, कुणाल सिंग राठौर.
PBKS: प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), अजमतुल्लाह उमरजई, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंह, सूर्यांश शेडगे, मार्को जानसन, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, विजयकुमार विशक, नेहल वढेरा, प्रवीण दुबे, हरप्रीत बराड़, विष्णु विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, कुलदीप सेन, हरनूर सिंह, मुशीर खान, पायल अविनाश, जेवियर बार्टलेट, लॉकी फर्ग्युसन, जोश इंग्लिस.