RCB captain for IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग च्या (IPL 2025) 18 व्या सीझनला 21 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी आता संघांकडून कर्णधारांची घोषणा केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाब किंग्सने ‘बिग बॉस’मध्ये कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा केली होती. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नव्या कर्णधाराच्या घोषणा केली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने या हंगामासाठी विराट कोहलीऐवजी रजत पाटीदारची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. 2022 ते 2024 दरम्यान संघाचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिसला यावर्षी संघाने रिटेन केले नाही. तसेच, विराट कोहली देखील पुन्हा कर्णधार होण्यास तयार नसल्याने अखेर रजत पाटीदारकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पाटीदार 2021 मध्ये आरसीबीच्या संघात सामील झाल्यापासून त्याने तीन हंगाम खेळले आहेत. त्याने 28 सामन्यांमध्ये 158.85 च्या स्ट्राइक रेटने 799 धावा केल्या आहेत. रजतने त्याच्या कामगिरीने संघात स्वतःचे महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.
मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये जन्मलेल्या रजत पाटीदारला आयपीएल 2021 मध्ये 20 लाख रुपये किमतीत आरसीबीने खरेदी केले होते. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी आरसीबीने त्याला 11 कोटी रुपयांच्या किंमतीत कायम ठेवले.
आयपीएल 2025 स्पर्धेसाठी आरसीबीचा संघ:
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या, यश दयाल, लियम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, रोमारियो शेफर्ड, सुयश शर्मा