ICC T20 Rankings: भारताचा युवा विस्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) त्याच्या वादळी खेळीने इंग्लंडविरुद्धची टी20 मालिका गाजवली. या मालिकेतील 5 सामन्यांमध्ये त्याने 55.80 च्या सरासरीने 279 धावा केल्या. याशिवाय, 135 धावांची तुफानी खेळी देखील केली. याचा फायदा अभिषेकला आयसीसी क्रमावरीत झाला आहे.
नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (ICC) टी-20 खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत अभिषेकला मोठा फायदा झाला असून, त्याने मोठी झेप घेतली आहे. आयसीसी टी-20 क्रमावारीत तो थेट40व्या स्थानावरून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने फलंदाजांच्या यादीत तब्बल 38 स्थानांची झेप घेतली आहे.
सध्या अभिषेकच्या खात्यात 829 रेटिंग पॉइंट्स आहेत. अभिषेकच्या पुढे केवळ ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ट्रॅव्हिस हेडच्या खात्यात 855 रेटिंग पॉइंट्स आहेत.
आयसीसी टी-20 क्रमावारीच्या टॉप-10 मध्ये भारताचे तीन फलंदाज आहेत. तिलक वर्मा (803) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (738) अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर घसरले आहेत. दोघांनाही एक स्थानाचा फटका बसला आहेइंग्लंडचा फिल साल्ट (798) चौथ्या स्थानावर आहे.
गोलंदाजीबद्दल सांगायचे तर वरूण चक्रवर्ती 3 स्थानांची झेप घेत आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तो 705 रेटिंग पॉइंटसह आदिल रशीदसोबत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर वेस्ट इंडिजचा स्पीनर अकील हुसैन 707 पॉइंट्सह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.