120 महिलांसोबत जोडले गेले होते नाव, आता ट्रम्प यांच्या माजी सूनेला डेट करतोय ‘हा’ प्रसिद्ध गोल्फपटू

Tiger Woods- Vanessa Trump relationship | प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स (Tiger Woods) पुन्हा एकदा त्याच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. याआधी अनेक अफेअर्समुळे तो वादग्रस्त ठरला होता. विशेष म्हणजे, सध्या तो ज्या महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे, ती अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित आहेत.

टायगर वूड्स सध्या व्हेनेसा ट्रम्प (Vanessa Trump) ला डेट करत आहे. व्हेनेसा या डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर (Donald Trump Jr) यांच्या माजी पत्नी आहेत. टायगर वूड्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याची माहिती दिली. त्याने फोटो शेअर करत “Love is in the air and life is better with you by my side” असे कॅप्शन दिले आहे. तसेच, आमच्या प्रायव्हेसीचा सन्मान करावा, असेही त्याने म्हटले आहे.

यापूर्वीही दोघांच्या नात्याबद्दल चर्चा झाली होती, मात्र अधिकृत दुजोरा नव्हता. अखेर, टायगर वूड्सच्या सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांच्या नात्याला पुष्टी मिळाली आहे.

व्हेनेसा ट्रम्प यांचा 2018 मध्ये घटस्फोट (Vanessa Trump Divorce) झाला असून त्यांना पाच मुलं आहेत. रिपोर्टनुसार, टायगर आणि व्हेनेसा यांची भेट त्यांच्या मुलांमुळे झाली असावी. दोघांचीही मुलं फ्लोरिडातील एकाच शाळेत शिकतात. दरम्यान, 49 वर्षीय टायगर वूड्स सध्या दुखापतीमुळे (Tiger Woods Injury) गोल्फपासून दूर आहे.

दरम्यान, 49 वर्षीय टायगर सध्या दुखापतीमुळे गोल्फपासून दूर आहे. टायगर वूड्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा होत असतो. तो जवळपास 120 महिलांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आली होती. या अफेअर्समुळे त्याच्या वैवाहिक आयुष्यावरही परिणाम झाला होता. आता तो व्हेनेसा ट्रम्पसोबतच्या नात्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.