‘कॅप्टन कूल’ची पुन्हा एंट्री! दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर, धोनी सांभाळणार CSK ची कमान

MS Dhoni returns as CSK captain

MS Dhoni returns as CSK captain | चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला IPL 2025 च्या मध्यात मोठा झटका बसला आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) उजव्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला असून, आता उर्वरित सामने एमएस धोनी (MS Dhoni) संघाचं नेतृत्व करणार आहे. CSK चे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, “गुवाहाटीत राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्धच्या सामन्यात ऋतुराजला चेंडू लागला होता. त्या वेदनेनंतरही तो पंजाब किंग्ज विरुद्ध खेळला, पण X-ray स्पष्ट नव्हता. MRI स्कॅनमध्ये ‘रेडियल नेक फ्रॅक्चर’ असल्याचे निष्पन्न झाले.” धोनी पुन्हा कर्णधार म्हणून पुन्हा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यात उतरेल.

सीएसकेने देखील X अकाउंटवरून पोस्ट करत या बाबतची घोषणा केली आणि ऋतुराजला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

CSK सध्या गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे. त्यांनी पहिल्या 5 सामन्यांपैकी 4 सामने गमावले आहेत. सलग 4 पराभवानंतर धोनीच्या नेतृत्वाचा अनुभव आता संघाला पुन्हा कामी येईल. धोनी IPL 2023 च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध विजय मिळवून पाचवेळा चॅम्पियन ठरला होता. त्यानंतर सीएसकेने नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराजकडे सोपवली होती.

27 वर्षीय गायकवाडसाठी कर्णधारपदाची सुरुवात काहीशी अपयशी ठरली. IPL 2024 मध्येही CSK प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नव्हती. आता दुखापतीमुळे त्याला मध्येच कर्णधारपद सोडावे लागले आहे.