Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार?

India’s Champions Trophy Squad: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला लवकरच सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि न्युझीलंड संघामध्ये 19 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. तर 10 मार्चला अंतिम सामना खेळला जाईल. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार खेळली जाईल. यातील काही सामने पाकिस्तान, तर काही सामने दुबईत पार पडतील. भारतीय संघाचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरोधात असेल. लवकरच या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

12 जानेवारीआधी होणार संघाची घोषणा

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) स्पर्धेसाठी संघाची (India’s Champions Trophy Squad) घोषणा करण्याची अंतिम तारीख 12 जानेवारी निश्चित केली आहे. त्यामुळे त्याआधी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे असेल. तर रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराहला हार्दिक पांड्याच्याजागी उपकर्णधार केले जाऊ शकते.

याशिवाय, शुभमन गिलचे वनडे संघातील स्थान पक्के आहे. त्यामुळे जैस्वालला बॅकअप सलामीवीर म्हणून निवडले जाऊ शकते. याशिवाय, मधल्याफळीत विराट आणि श्रेयस अय्यरची निवड केली जाईल. यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुल आणि ऋषभ पंतला स्थान मिळण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या आणि नीतीश कुमार रेड्डीचे स्थान देखील पक्के समजले जात आहे. अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनाही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. (India’s Champions Trophy Squad)

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाचे सामने

20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

5 मार्च – उपांत्य फेरी 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर

9 मार्च – फायनल – गद्दाफी स्टेडियम, लाहोर