Ranji Trophy : एकापाठोपाठ एक मालिकेतील पराभवानंतर आता भारतीय क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य करण्यात आले आहे. BCCI गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर भर देत आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावर झालेल्या पराभवानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक केलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मासह (Rohit Sharma) अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.
विराट-रोहित रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत खेळणार
विराट कोहली दिल्लीच्या संघाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. 30 जानेवारीला रेल्वेविरुद्धच्या सामन्यात विराट मैदानावर खेळण्यासाठी उतरण्याची शक्यता आहे. जवळपास 1 दशकानंतर विराट रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल.
विराटसोबतच, रोहित शर्मा देखील या स्पर्धेत खेळणार आहे. रोहित शर्मा अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जम्मू-काश्मीरविरुद्धच्या आगामी रणजी ट्रॉफी सामन्यात मुंबईकडून खेळणार आहेत.
एक दशकानंतर रणजी खेळणार
विराट आणि रोहित दोघेही खेळाडू जवळपास 1 दशकानंतर रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहेत. कोहलीने दिल्लीसाठी शेवटचा रणजी ट्रॉफी सामना 2012 मध्ये उत्तरप्रदेश संघाविरुद्ध खेळला होता. तर रोहित शर्माने 2015 मध्ये मुंबईकडून खेळताना उत्तर प्रदेशविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.