Virat Kohli : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने मोठा विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहलीने (Virat kohli total centuries in all format) शतकी खेळी करत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला आहे. विराटने 111 चेंडुमध्ये 100 धावांची खेळी केली. या शतकासोबतच विराटने अनेक रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केले आहेत. विराटने धावांसोबतच शतकांचा देखील रेकॉर्ड केला आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय करिअरमधील हे एकूण 82 वे शतक होते.
विराट कोहलीच्या नावावर शतकांचे रेकॉर्ड
विराट कोहली हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणार खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 299 वनडे सामन्यात 51 शतकं ठोकण्याची कामगिरी केली आहे. याशिवाय, त्याच्या नावावर या फॉर्मेटमध्ये 14085 धावा आहेत. 14 हजार धावांचा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये गाठण्याची कामगिरीही त्याने केली आहे.
विराटने 123 कसोटी सामन्यातील 210 डावांमध्ये 30 शतकं ठोकली आहे. तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1 शतक त्याच्या नावावर आहे. अशाप्रकारे, त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 82 शतकं आहेत. विराटने आयपीएलमध्येही 252 सामन्यात 8 शतकं ठोकण्याची कामगिरी केली आहे.
दरम्यान, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या गटफेरीत भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी करताना 49.4 ओव्हरमध्ये सर्वबाद 241 धावा केल्या. तर भारताने 42.3 ओव्हरमध्येच 4 विकेट्स गमावत हे लक्ष्य गाठले.