भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला! एकदिवसीय सामन्यात ठोकल्या 435 धावा

भारतीय महिला क्रिकेट संघाने (India Women Cricket Team) आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात 400 धावांचा टप्पा पार केला आहे. हा संघाचा आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाने आयर्लंडविरुद्ध 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावत 435 धावा केल्या. अशी कामगिरी भारतीय पुरुष क्रिकेट संघालाही आतापर्यंत जमलेली नाही. ही भारतीय क्रिकेटमधील एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारतीय पुरुष संघाने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावत 418 धावा केल्या होत्या.

भारतीय महिला संघाने या सामन्यात आयर्लंडचा 304 धावांनी पराभव केला. धावांच्या बाबतीतही भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात भारतीय संघाने 5 विकेट्स गमावत 435 धावा केल्या. तर धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 31.4 ओव्हरमध्ये सर्वबाद 131 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

या सामन्यात भारताकडून स्मृती मंधानाने 135 धावा आणि प्रतिका रावलने 154 धावांची शतकी खेळी केली. प्रतिका रावलचे एकदिवसीय सामन्यातील हे पहिलेच शतक आहे. तर रिचा घोषने 59 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आयर्लंडकडून ऑर्ला प्रेंडरगास्टने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

आयर्लंडच्या महिला खेळाडूंना फलंदाजीमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही. केवळ सारा फॉर्ब्सने 41 धावा आणि ऑर्ला प्रेंडरगास्टने 36 धावा केल्या. तर भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.