जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावात गोलंदाजी करणार की नाही? मोठी अपडेट आली समोर

Jasprit Bumrah Injury Update: भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS) बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सीरिजमधील अंतिम कसोटी सामना खेळला जात आहे. दुसऱ्या दिवसाखेर भारताने सामन्यात 145 धावांची आघाडी घेतली आहे. मात्र, दुसरीकडे या सामन्यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah Injury) दुखापत झाल्याचे समोर आले आहे. बुमराह या सीरिजमधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्यामुळे बुमराह दुखापत झाल्याने भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी लंचनंतर 1 ओव्हर टाकल्यानंतर बुमराहने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला दुखापत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये देखील नेण्यात आले. आता बुमराहच्या दुखापतीबाबत भारताचा गोलंदाज प्रसिध कृष्णाने माहिती दिली आहे.

जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्याची माहिती प्रसिध कृष्णाने दिली. त्याने बुमराहच्या (Jasprit Bumrah Injury Update) दुखापतीबाबत अपडेट देताना सांगितले की, बुमराहला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तेथे वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. बुमराहला पाठदुखीचा त्रास होत आहे.

वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे सिडनी कसोटीत बुमराह खेळण्यासाठी उतरेल, अशी आम्हाला आशा आहे., असे त्याने सांगितले. त्यामुळे बुमराह सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोलंदाजीसाठी मैदानावर उतरणार की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, बुमराहने आतापर्यंत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 32 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे.   यासोबतच, तो ऑस्ट्रेलियामध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.