ICC champions trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, 9 मार्चला अंतिम सामना पार पडेल. या स्पर्धेचे सामने पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसह दुबई येथे पार पडणार आहेत.
या स्पर्धेत एकूण 8 संघ भाग घेणार असून, सर्व संघाना 2 गटात विभागण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध खेळला जाईल. तर 23 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तानमधील सामना रंगणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 गट
- अ गट – पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांगलादेश
- ब गट – दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारतीय संघाचे सामने
- 20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
- 23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
- 02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक
- 19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची
- 20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
- 21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची
- 22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
- 23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
- 24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी
- 25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
- 26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
- 27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी
- 28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर
- 01 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
- 02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
- 4 मार्च, उपांत्य फेरी 1, दुबई
- 5 मार्च, उपांत्य फेरी २, लाहोर
- 9 मार्च, फायनल, लाहोर
- 10 मार्च, राखीव दिवस