संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

दिनविशेष! आज जागतिक फणस दिवस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आज जागतिक फणस दिवस. सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये फणस हे फळ आकाराने सर्वात मोठे असते. भारत आणि दक्षिण आशिया हे फणसाचे मूळ स्थान आहे. त्यातही बंगळुरू, गोवा, कोकण या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आहेत. फणस दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे कापे आणि दुसरे रसाळ. आता फणसाचे दोन प्रकार म्हटले म्हणजे खवय्यांचे पण दोन प्रकार पडणारच ना! बस्स, इथेही तसचं झालं, काहींना कापा फणसाचे गरे आवडतात, तर काहींना रसाळ फणसाचे! पण अस्सल खवय्ये मात्र यात भेदभाव करत नाहीत. ते रसाळ असो वा कापा फणस असो दोन्ही चवीने खातात आणि तुम्ही सुद्धा असंच केलं पाहिजे.

फणस कोणताही असो समोर दिसला की चांगला दाबून खाल्ला पाहिजे. असं का विचारताय? अहो कारण फणसात खूप आरोग्यदायी तत्व असतात. म्हणजे जिभेला चव मिळते आणि शरीराला पोषण! काय? तुम्हाला नव्हतं माहित? अहो हे खरंय, फणस खाल्लाने शरीराला एरव्ही न मिळणारे पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणात मिळतात, त्यामुळे फणस खाल्ला पाहिजे.
फणस हा आरोग्यदायी आहे ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे आपल्याकडे फणस हा फक्त चवीसाठी आणि भुकेसाठी खाल्ला जातो, मात्र खरंतर फणसात जीवनसत्त्व अ, जीवनसत्त्व ब-6 आणि जीवनसत्त्व क ची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. जीवनसत्त्व ‘अ’ हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर असते. जीवनसत्त्व ब6 हे मेंदूच्या विकासासाठी पोषक असते आणि जीवनसत्त्व क हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे जर तुम्ही फणस खात नसाल किंवा कमी खात असाल, तर तुम्ही चुकी करताय. जीवनसत्त्वांनी युक्त असं हे फळ तुम्ही शक्य तितक खायला हवं.

फणसात फक्त जीवनसत्त्वे असतात असे नाही तर त्यात खनिज पदार्थांची मात्र देखील मोठ्या प्रमाणावर असते. तुम्ही हवं तर कच्च्या फणसाची भाजी देखील बनवून खाऊ शकता. यातून तुम्हाला कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्निशियम, फोलिक अॅसिड, थायामिन आणि नियासिन सारखे शरीराला अति लाभदायी असणारे खनिज पदार्थ मिळतात. बघा वरून काटेरी असलेला फणस आतून फक्त गोडच नसतो तर पौष्टिक सुद्धा असतो. या कोरोनाच्या काळात आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही या काळात फणस जर खाल्लात तर त्यातून तुमची रोगप्रतिकार शक्ती इतकी वाढेल कि तुम्हाला कोरोना विषाणूशी लढण्यासाठी बळ मिळेल.

फणसात जीवनसत्त्व क असते. जे जीवनसत्त्व क शरीरातील कॉलेजनच्या निर्मिती मध्ये साहाय्य करते. हे कॉलेजन आपली त्वचा नेहमी तरूण राखण्यासाठी महत्त्वपूर्ण असते. या व्यतिरिक्त जीवनसत्त्व अ हे आपल्या डोळ्यांच्या आर्टरीची संकुचन प्रक्रिया सुद्धा थांबवते. याचा फायदा असा होतो कि म्हातारपणी सुद्धा डोळ्यांची दृष्टी कायम राहते.

फणस हे व्हेज मिट आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न अजूनही असेल की मिट म्हणजे तर मांस मग फणसाला व्हेज मिट म्हणण्यामागे नेमकं कारण तरी काय? तर मंडळी, केवळ फणस आपल्याला एका सेवनातून इतके पौष्टिक घटक आणि तत्व देतं जे आपल्याला विविध फळ आणि भाज्या खाल्ल्यानंतर मिळतात. ज्या प्रमाणे मांस खाल्ल्याने एकाचवेळी तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात तसेच केवळ फणस खाल्ल्यानेही तुमच्या शरीराला अनेक लाभ होतात आणि म्हणून फणसाला व्हेज मिट असेही म्हणतात.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

2 thoughts on “दिनविशेष! आज जागतिक फणस दिवस”

Leave a Comment

Your email address will not be published.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami