संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 09 February 2023

आयडीबीआयच्या ‘या’ योजनेत चांगल्या परताव्यासह टॅक्सची बचत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आयडीबीआय बँकेने ग्राहकांसाठी ‘टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिट’ योजना सुरू केली आहे. या योजनेत तुम्ही पैशांची गुंतवणूक करू शकता, त्यातून तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पाच वर्षांची एफडी करावी लागेल. तसेच या योजनेत पैसे गुंतवल्यास तुम्हाला इनकम टॅक्स कायदा कलम 80C अंतर्गत टॅक्समधून सूट मिळेल, असा दावाही बँकेच्या वतीने करण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे आयडीबीआय बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला बँकेच्या टॅक्स सेव्हिंग फिक्स डिपॉझिट योजनेत पाच वर्षांसाठी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या योजनेंतर्गत कोणीही खाते सुरू करू शकते फक्त यासाठी ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी अशी अट आहे. पाच वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्हाला ही रक्कम काढता येते. तसेच या गुंतवणुकीवर इनकम टॅक्सच्या नियमानुसार सूटदेखील मिळते. या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीवर 5.50 टक्क्यांनी व्याज देण्यात येते, तर ज्येष्ठ नागरिकांना अधिक 0.50 म्हणजे सहा टक्के व्याज देण्यात येते.

तुम्हाला या योजनेत खाते सुरू करायचे असल्यास तुम्ही जवळच्या आयडीबीआय बँकेला भेट देऊन अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही ही गुंतवणूक तारण ठेवून, शैक्षणिक लोन, होम लोन, पर्सनल लोनदेखील काढू शकता. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण परतावा मिळतो.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami