संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

जाणून घ्या! फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या टिप्स

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोरोनाचा सर्वात पहिला फटका रुग्णांच्या फुफ्फुसांना बसतो. त्यामुळे या काळात फुफ्फुसांची योग्यपद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. फुफ्फुसांची सोप्या पद्धतीने कशी काळजी घ्यायची याविषयी  वेदिक्युअर हेल्थकेअर अँड वेलनेसच्या आयुर्वेदाचार्य डॉ. सायली मोदी यांनी काही टीप्स दिल्या आहेत.

१) हर्बल चहा

आले, काळी मिरी, वेलची, पुदीन्याची वाळलेली पाने अशा सर्व कोरड्या औषधी वनस्पतींचे मिश्रण करून आपण घरी पावडर तयार करू शकता आणि आपल्या रोजच्या चहामध्ये याचा वापर करू शकता.

२) सोनेरी दुध
एक ग्लास गाईच्या दुधामध्ये पाव चमचा हळद ते दुध तीन ते चार मिनिटे उकळवून घ्या. केवळ गरम दुधात हळद घालून न पिता ते उत्तम परिणामांकरिता हळद घातलेलं ते दुध छान उकळवा.

३) वाफ घ्या

आपण गरम पाण्यात ओवा घालून त्याची वाफ घेऊ शकता. ज्यामुळे श्वासनलिका उघडण्यासाठी तसेच श्वासोच्छवासातील अडथळा दूर करण्यासाठी नक्कीच फायदा होता.

४) तुळशी, पिंपळ, जेष्ठमध, अडुळसा या औषधी वनस्पती सम प्रमाणात घेऊन तुम्ही याचे चूर्ण तयार करू शकता. हे चूर्ण दिवसातून दोनदा कोमट पाण्यातून सेवन करणे लाभदायक ठरेल.

५) एक लिटर पाणी घेऊन त्यात १/२ चमचा सुंठ पावडर घाला आणि साधारण १५ ते २० मिनिटे उकळवून घ्या. त्यानंतर हे पाणी पूर्णपणे थंड होऊ दया आणि दिवसभर या पाण्याचे सेवन करा.

६) लिंबूवर्गीय फळं जसे द्राक्षे, संत्री, अननस, सफरचंद, डाळींब यांचे सेवन करावे.

७) भोपळा, गाजर, पालेभाज्या, आले, कांदा, लसूण यांचा आहारात समावेश करा.

८) दररोज पहाटे १ चमचा च्यवनप्राश घ्या.

९) तेलकट, चरबीयुक्त, जंक फूड, बेकरी उत्पादने आणि जड पदार्थ खाणे टाळा.

१०) व्यायाम म्हणजेच फुफ्फुसांचा आहार होय. फुफ्फुसात वायुमार्गाचा प्रवाह सहजरित्या होण्याकरिता व्यायामाची आवश्यकता आहे.

दिर्घ श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करा. १५ दीर्घ श्वास घ्या आणि असे ३ वेळा पुन्हा करा.

प्राणायामाचे प्रकार –

− भ्रामरी प्राणायाम
− भस्त्रिका प्राणायाम
− अनुलोम विलोम प्राणायाम
− कपालभाती प्राणायाम

दिवसात 15 मिनिटे चालणे अथवा जॉगिंग करणे आरोग्यास लाभदायी.
एका दिवसात ४ ते ५ फुगे फुगवा.
११) नस्य
दोन्ही नाकपुडींमध्ये औषधी द्रव्याचे थेंब टाकणे ज्यामुळे फुफ्फुसाचा संसर्ग रोखता येतो.
१२) धूम्रपान आणि तंबाखुचे सेवन टाळा.

Leave a Comment

Your email address will not be published.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami