संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

जाणून घ्या! घरातील ज्येष्ठ व्यक्तींना घरगुती अपघातांपासून कसे वाचवाल?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

एखादी व्यक्ती जेव्हा वृध्दत्वाकडे झुकते तेव्हा तिच्या चालण्या-फिरण्याविषयीच्या चिंता कुटुंबियांना भेडसावू लागतात. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळून येणाऱ्या तब्येतीच्या तक्रारींमध्ये पडल्याने किंवा घसरून होणारे अपघात ही प्रमुख समस्या असते. उतारवयात होणाऱ्या घरगुती दुर्घटना ज्यांना ‘डोमेस्टीक फॉल्स’ असेही म्हटले जाते. या वयोगटात होणाऱ्या दुखापतींमागचे ते मुख्य कारण ठरत आहे. वारंवार पडल्याने होणाऱ्या या अपघातामुळे अनेक वयोवृद्धांना अपंगत्वाचा सामना करावा लागतो. परिणाम या अपघातात अनेकांना प्राण गमवावा लागतो. याविषयी अधिक माहिती देत आहेत, जॉंईट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. नरेंद्र वैद्य.

भारत हा लोकसंख्येनुसार जगातील दुस-या क्रमांकाचा देश आहे. या लोकसंख्येत साठ वर्षे वयापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात सध्या आठ कोटींपेक्षा जास्त लोक हे साठ पेक्षा अधिक वयाचे आहे.

वयाची साठी ओलांडली की, विविध आजार शरीराला ग्रासत असतात. साठीनंतर शारीरिक, मानसिक क्षमता कमी होतात आणि मेंदूचे काम हळुहळू कमी होते. त्यामुळे अनेक वृद्ध लोकांना मानसिक आजाराचा त्रास असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह, स्नायूंचे आजार, मणक्याचा त्रास आणि डोळ्यांचे विकार हे उतारवयात जाणवत आहेत. सध्या आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीमुळे आज माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. मात्र त्यामुळे प्रत्येकाला म्हातारपण टळणार आहे, असं नाही तर ते येणारच आहे. म्हणून उतारवयात स्वतः आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

घरगुती दुर्घटना होण्यामागची कारणे –

–    वाढत्या वयामुळे स्नायुंना येणारा कमकुवतपणा

–    चालताना तोल जाणे

–    वयोमानानुसार आकलनशक्ती कमी होणे

–    प्रदिर्घ आजार व त्यामुळे होणारे शारीरीक बदल उदा. संधीवात, पार्किन्सस, अल्झायमर

–    दृष्टी व ऐकण्याची क्षमता कमी होणे.

भौगोलिक परिस्थिती जसे की

–    अपुरा प्रकाश

–    घरात अस्ताव्यस्त पडलेले सामान

–    लुज कार्पेट्स

–    निसरड्या जागा अथवा जमिनी

–    सुरक्षित साधनांचा अभाव

–    झोपेच्या व इतर गुंगी आणणाऱ्या औषधांचा वापर

घरगुती दुर्घटनांमुळे कोणत्या प्रकारची दुखापत होऊ शकते

–    खुब्याच्या हाडाचे फ्रॅक्चर

–    मनगटाच्या हाडाचे फ्रॅक्चर

–    मणक्याच्या हाडाचे फ्रॅक्चर

–    घोट्याजवळील हाडाचे फ्रॅक्चर

घरगुती अपघात टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी

–    न घसरणाऱ्या चप्पल अथवा बुटांचा वापर करणे

–    घरात पुरेसा प्रकाश असावा. झोपायची खोली, बाथरुम, जिना, हॉल येथे नाईट लॅम्प असावेत

–    कार्पेट्स जमिनीला फिक्स करणे

–    बाथरुम व संडास येथे हात पकडण्यासाठी बार असावेत

–    जिन्याच्या दोन्ही बाजुंना आधार घेण्यासाठी रेलींग असावेत

–    वृध्द लोकांनी शिडीवर चढणे अथवा स्टुलवर चढणे टाळावे

–    घरातील निसरड्या जागांची नियमितपणे साफसफाई करणे

–    कान व डोळे यांची नियमितपणे वैद्यकीय तपासणी करणे.

–    नियमित व्यायाम करणे,  ऑस्टीओपोरेसिस,  संधीवात सारख्या आजारावर योग्य उपचार करणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami