संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

दिनविशेष! न्यूझीलंडचे माजी सर्वोत्तम सलामीवीर ग्लेन टर्नर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

न्यूझीलंडचे माजी सर्वोत्तम सलामीवीर ग्लेन टर्नर यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म २६ मे १९४७ रोजी झाला.

ग्लेन टर्नर यांचा समावेश न्यूझीलंडच्या दिग्गज फलंदाजांमध्ये होतो. न्यूझीलंड क्रिकेटला महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देणाऱ्या सर्वात यशस्वी खेळाडूंमध्ये टर्नर यांचा समावेश आहे. डुनेडीन येथे जन्मलेले टर्नर यांनी अनेक ऐतिहासिक विक्रमांची नोंद आपल्या नावावर केली आहे. ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०० शतके ठोकणाऱ्या निवडक खेळाडूंमध्ये सामील आहेत. याशिवाय ते क्रिकेट इतिहासात १५० धावा करणारे पहिले क्रिकेटपटू आहेत.

ग्लेन यांनी आपला १९६९ साली ऑकलँड येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत न्यूझीलंड संघाकडून ४१ कसोटी सामने आणि ४१ वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी कसोटीत ४४.६४ च्या सरासरीने २९९१ धावा केल्या आहेत. यामध्ये ७ शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर वनडेत त्यांनी ४७ च्या सरासरीने १५९८ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ शतके आणि ९ अर्धशतकांचा समावेश आहे.१९७१-७२ मध्ये गयाना कसोटीत टर्नर यांनी (२५९) टेरी जार्विस यांच्यासह ३८७ धावांची सलामी दिली. कसोटी इतिहासातील ही चौथी सर्वाधिक सलामी आहे. १९७३-७४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ख्राइस्टचर्च कसोटीत टर्नर यांनी दोन शतके झळकावली. एका कसोटीत दोन शतके झळकावणारे ते न्यूझीलंडचे पहिले फलंदाज ठरले. या कसोटीतील यजमानांचा विजय ऑस्ट्रेलियावरील पहिला कसोटी विजय ठरला. त्यांचा एक खास विक्रम म्हणजे ग्लेन टर्नर यांचा वनडे डावातील चेंडू खेळण्याचा विक्रम. टर्नर यांनी १९७५ विश्वचषकात ७जून १९७५ रोजी झालेल्या वनडे सामन्यात २०१ तर १४ जून १९७५ रोजी झालेल्या सामन्यात १७७ चेंडू खेळले होते. टर्नर सोडून कोणत्याही क्रिकेटरला वनडे डावात १७७ पेक्षा जास्त चेंडू खेळता आले नाहीत. शिवाय टर्नर दोन्ही वेळा नाबाद राहिले होते.

ग्लेन टर्नर यांनी ३८ वर्षापूर्वी भारतीय मुलीशी लग्न केले आहे. टर्नर यांनी भारतात राहणाऱ्या सुखविंदर गिल यांच्या बरोबर लग्न केले.
ग्लेन १९६९ साली भारत दौऱ्यावर आले होते. यादरम्यान एका पार्टीमध्ये त्यांची ओळख सुखविंदर यांच्या बरोबर झाली. जेव्हा सुखविंदर यांनी टर्नर यांना पाहिले, तेव्हा सुखविंदर त्यांना पाहून त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. येथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी १९७३ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या लुधियाना येथे राहणाऱ्या सुखविंदर आज न्यूझीलंड मधील डुनेडिन या गावी सुखविंदर सुखी टर्नर या नावाने प्रसिद्ध आहेत. सुखविंदर या न्यूझीलंडला जाऊन राजकारणामध्ये सक्रिय झाल्या. त्या १९९५ पासून २००४ पर्यंत डुनेडिनच्या महापौर राहिल्या होत्या. तत्पुर्वी तीन वेळा त्या येथे नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना न्यूझीलंडमधील मोठा भारतीय चेहरा मानले जाते. सोबतच त्यांना न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारा मोठा चेहराही मानले जाते. २००४मध्ये त्यांना भारत सरकारकडून प्रवासी भारतीय सन्मानाने सन्मानित करण्यात आले. सुखविंदर सुखी टर्नर यांनी इतिहास व राज्यशास्त्र विषयात अमेरिकत शिक्षण घेतले होते. टर्नर न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख राहिले आहेत.सुखविंदर आणि टर्नर यांना दोन अपत्य आहेत.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami