संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा, पावसाळ्यामध्ये पोटाच्या विकारांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – बदलत्या जीवनशैलीमुळे खाणे-पिणे, झोप, मानसिक स्वास्थ आणि आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, पोटाच्या लहानसहान तक्रारीही भविष्यात गंभीर रूप धारण करू लागल्या आहेत परंतु पावसाळ्यामध्ये बाहेरील पदार्थ खाल्ल्यामुळे आता पोटविकारांमध्ये वाढ झाल्याचे निदेर्शनास आले आहे. पावसाळ्यात अनेकांना बाहेरचे गरमागरम पदार्थ खायला आवडतात विशेषतः तळलेले पदार्थ म्हणजेच कांदा – बटाटा भजी तसेच चायनीज पदार्थांचा मोह आवरता येत नाही परंतु हेच पदार्थ पोटाच्या विकाराला कारणीभूत ठरत आहे.

कल्याण शहरातील स्टारसिटी रुग्णालयाच्या सर्वेक्षणानुसार पावसाळ्यामध्ये बाहेरील खाद्य पदार्थ खाल्यामुळे पोटाच्या विकारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे, तसेच किडनीच्या विकारातही लक्षणीय वाढ झाली आहे. खाद्यपदार्थ खाल्ल्यावर तेथे उपलब्ध असलेले निकृष्ट दर्जाचे पिण्यासाठी पाणी व खाण्याच्या पदार्थावर घोंघावणाऱ्या माश्या यातून बरेचदा जिवाणूंना आपल्या शरीरात प्रवेश करायला आयती संधी मिळत आहेत. याबाबत माहिती देताना डॉ. प्रदीप शेलार सांगतात, ” गेल्या १५ दिवसात जुलाबाचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये ३० टक्के वाढ झाली असून सर्वेसक्षणानुसार या आजारासाठी बाहेरील खाद्यपदार्थ कारणीभूत ठरत आहेत. भट्टीशेजारी काम करणाऱ्या आचाऱ्यांची स्थिती अधिक वाईट असते त्यांना येणाऱ्या सततच्या घामामुळे जीवाणूंचा संसंर्ग  वाढण्याचा धोका असतो. अन्न शिजवताना, वाढताना हातमोजे (ग्लोव्ह्ज ) घालणे फार महत्वाचे आहे. डोसा, पावभाजी, चहा असे पदार्थ गरम असल्याने त्यातून  संसर्ग कमी होतो परंतु मात्र सॅण्डविच, भेळपुरी-शेवपुरी- चायनीज, फ्रॅंकी – भजी अशा पदार्था साठी कांदा, टोमॅटो कोथींबीर खूप आधीपासून चिरलेले असण्याची शक्यता असल्याने त्यातून ई-कोलाय, कॉलीफॉर्म, स्टॅफिलोकोकस ऑरिअस अशा जुलाबाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंचा संसर्ग होत असतो. सहज उपलब्ध होणारी रस्त्यावरील लिंबू पाणी, ताक, फळांचे ज्यूस, कोल्ड्रिंक आणि इतर ड्रिंक्ससुद्धा पोटांच्या विकाराला कारणीभूत ठरत आहेत.

“पावसाळ्यामध्ये पोटाच्या  विकारांकडे अजिबात  दुर्लक्ष करू नये, गॅस आहे म्हणून काहीजण सोडा पितात, मेडिकल दुकानातील औषधे घेतात परंतु सतत पोट दुखायचा त्रास सतत होत असेल तर घरगुती औषधोपचारांवर अवलंबून राहू नये अशी माहिती डॉ. प्रदीप शेलार यांनी दिली.

26 thoughts on “रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळा, पावसाळ्यामध्ये पोटाच्या विकारांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ”

  1. Fertility medication hormones are needed to induce ovulation of multiple eggs for retrieval clomid for sale iloperidone increases levels of erythromycin stearate by affecting hepatic intestinal enzyme CYP3A4 metabolism

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami