संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 09 February 2023

मोफत सिलिंडर हवाय? Paytm ने आणली नवी ऑफर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नियमित व्यवहार करताना डिजिटल बँकिंग ॲप Paytm आपल्या ग्राहकांना विविध ऑफर्स देऊ करते. आता Paytm ने मोफत सिलिंडरची ऑफर्स आणली आहे.

Paytmवर केवळ आर्थिक व्यवहार होत नसून अनेक इतर सुविधाही घेता येतात. वीज बिल भरणे, गाड्या बुक करणे, LPG सिलिंडर बुक करणे आदी गोष्टीही Paytm वर अत्यंत सोप्या पद्धतीने केल्या जातात. या सेवांचा लाभ घेताना ग्राहकांना अनेकदा चांगला कॅशबॅक सुद्धा मिळतो तर कधी कधी ऑफर्स मिळतात. त्यानुसारच Paytm वरून सिलिंडर बुक केल्यास तुम्हाला मोफत सिलिंडर मिळू शकतो मात्र त्यासाठी काही पर्यायांचा अवलंब करावा लागणार आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा ऑफर्सबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमचा किचनचा खर्च कमी होऊ शकतो.

कसा मिळवाल मोफत सिलिंडर?

सिलिंडर बुक केल्यानंतर Paytm ॲपवर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी ‘FREEGAS’ हा कूपन कोड वापरा.

हे लक्षात ठेवा

महत्वाचे म्हणजे प्रत्येक युजरला ही ऑफर मिळणार नाही. हे केवळ निवडक विद्यमान युजर्ससाठी उपलब्ध आहे. याशिवाय नवीन पेटीएम युजर्सना 30 रुपयांचा फ्लॅट कॅशबॅक देखील मिळू शकतो. नवीनतम डीलसह, पेटीएम ॲपवर पैसे भरताना त्यांची पहिली बुकिंग फक्त प्रोमो कोड “FIRSTCYLINDER” वापरून करावी लागेल. ही परतावा ऑफर तीनही प्रमुख एलपीजी सिलिंडर कंपन्या इंडेन, एचपी गॅस आणि भारतगॅस यांना लागू आहे. याशिवाय वापरकर्ते पेटीएम पोस्टपेड नावाने Paytm Now Pay Later मध्ये नोंदणी करून पुढील महिन्यात सिलेंडर बुकिंगसाठी पैसे देऊ शकतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami