संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

दिनविशेष! आजच्याच दिवशी 1981 साली झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आजच्या दिवशी १९८१ साली सिंधुदुर्ग जिल्हयाची निर्मिती झाली. राजा भोज, चालुक्य, राष्ट्रकुट, शिलाहार व कदंब यांनी ज्या प्रदेशावर राजसत्ता गाजवली. तो प्रदेश म्हणजे कोकणच ह्रदय म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा.

१ मे १९८१ रोजी राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून या सिंधुदुर्गची निर्मिती केली. सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणाचा दक्षिणेकडील भाग आहे. त्याची निर्मिती आधीच्या रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात आली आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगूर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग अशा आठ तालुक्यांच्या एकत्रितकरणामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधीचे नाव दक्षिण रत्नागिरी जिल्हा होते, ते बदलून मालवणच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या बेटावरील सिंधुदुर्ग किल्यावरून सिंधुदुर्ग हे या जिल्ह्याचे नाव ठेवण्यात आले आहे. ओरोस येथे जिल्ह्याचे मुख्या्लय आहे. ओरोसची प्रशासकीय राजधानी सिडकोकडून उभारण्यात आली आहे. त्याला सिंधुदुर्ग नगरी असे म्हणतात.

सिंधुदुर्गला तब्बल १२१ किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त (३८) किल्ले असणारा तसेच सर्व प्रकारचे म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. तारकर्ली, मिठबाव, कुणकेश्वर, आचरा, देवबाग, मालवण, तोंडवली, भोगवे, निवती, कोंडुरा, वेळागर, वायंगणी यांसारखे नितांतसुंदर किनारे येथे आहेत. त्याशिवाय आंबोलीसारखे हिलस्टेशन, विजयदुर्ग, सिंधुदुर्गसारखे सागरी किल्ले, सावंतवाडीची लाकडी खेळणीनिर्मिती केंद्रे, अनेक मंदिरे अशी नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळे जिल्ह्यात आहेत. सिंधुदुर्गाला पारंपरिक सण व उत्सवांइतकंच कला, साहित्य व संस्कृतीच्या आविष्कारानंही समृद्ध केलं आहे. त्यामुळेच हा जिल्हा पर्यटकांसाठी आवडता ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. शेजारील गोवा राज्याप्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही निसर्गाची दैवी देणगी लाभली आहे. इथल्या सांस्कृतिक परंपरेचं गोव्याच्या संस्कृतीशी साधम्र्य आहे, तरीदेखील ठाणे, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यापेक्षाही सिंधुदुर्ग जिल्ह्याची संस्कृती व निसर्ग वेगळा आहे. १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami