संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

ऑनलाईन शॉपिंग ऍप ‘मिशो’सुद्धा आणणार आयपीओ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – ऑनलाईन शॉपिंग आणि रिसेलिंग व्यासपीठ उपलब्ध करून देणारी भारताची स्टार्ट कंपनी मिशो सुद्धा आता आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले असून २०२२ च्या शेवटी किंवा २०२३ च्या सुरुवातीला हा आयपीओ येण्याची शक्यता आहे.

मेशोमध्ये फेसबुकची मूळ कंपनी Meta Platforms ची गुंतवणूक आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार बंगळूरू स्थित या कंपनीकडून भारतीय आणि अमेरिकी एक्सचेंजचं मूल्यांकन सुरू आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात स्टार्टअप कंपनी मीशोने फिडेलिटी मॅनेजमेंट अँड रिसर्च कंपनी आणि बी कॅपिटल ग्रुप यांच्या नेतृत्वाखालील सीरिज एफ फंडिंग फेरीत तब्बल 57 कोटी रुपयांचा फंड उभारला होता. सध्या मीशो आपल्या व्यवसाय विस्तारत असून, छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात देखील कंपनीचा विस्तार झाला आहे. अशातच आता कंपनी 2023 च्या सुरुवातीला आपला आयपीओ आणण्याचा तयारीत आहे. आयपीओच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात निधी उभारण्याचे लक्ष कंपनीचे असणार आहे.

विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल या दोघांनी मिळून २०१५ साली मिशोची स्थापना केली होती. कपड्यांपासून कॉम्सेटिक्सपर्यंत सर्व काही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसेच, या अॅपच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीही होत असल्याने ग्रामीण भागातील महिलांमध्येही हा अॅप प्रचंड प्रचलित आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami