मुंबई – भारतीय शेअर बाजारात आलेली तेजी आजही कायम राहिली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५९ हजारांच्या वर गेला. निफ्टीही १७ हजार ६०० च्या वर गेला. यामुळे शेअर बाजारात ऐतिहासिक उसळीची नोंद झाली. यात ऑटो सेक्टर अधिक तेजीत होता.
आशियाई बाजारातून आलेल्या सकारात्मक संकेतांमुळे मुंबई शेअर बाजारात सकाळपासूनच तेजी होती. नंतर ती वाढत गेली. त्यात ऑटो सेक्टरच्या कंपन्यांच्या समभागांत जवळपास ८ टक्क्यांची वाढ झाली. खरेदीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्यामुळे निफ्टीही १७ हजार ६०० च्या वर गेला. तेजीच्या या बाजारात इंडसइंड बँक, आयटीसी, एसबीआय, रिलायन्स, हिरो मोटोकॉप यांच्या समभागांमध्ये जोरदार तेजी होती. बीपीसीएल, ग्रासिम, टाटा स्टील, टीसीएस आणि श्रीसिमेंट या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली होती.