मुदत ठेव (एफडी) आणि आरडी काढण्यासाठी लांबलचक फॉर्म भरावा लागतो. मात्र, बँक ऑफ बडोदाने ग्राहकांसाठी ही सुविधा विशेष केली आहे. यामुळे तुम्हाला लांबलचक फॉर्म भरावा लागणार नाही. म्हणजेच एफडी आणि आरडीसाठी तुम्ही डिजिटल गुंतवणूक करू शकता.
बँक ऑफ बडोदाने ट्विट केल्यानुसार, तुम्ही एफडी आणि आरडी खाते ऍपच्या मदतीने उघडू शकता. यामध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करू शकता. या सुविधेचे नाव bob world असे आहे.
बँक ऑफ बडोदाने आपल्या ट्विटमध्ये एक फोटो देखील एम्बेड केला आहे. या फोटोमध्ये लिहिले आहे की, bob world च्या जगात तुम्ही चालता-फिरता FD आणि RD उघडू शकता. याशिवाय तुम्ही वेल्थ क्रिएशन निर्माण करू शकता. याशिवाय, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही FD आणि RD बंद करू शकता. तसेच तुम्ही ई-रिसिप्ट बघू शकता.