1900 साली स्थापन झालेली मुरुगप्पा ग्रुपमधील ट्युब इन्वेस्टमेंट कंपनी ही १९४९ साली स्थापन झाली आहे. सायकल, मोटारीचे विविध पार्ट्स, मेटल बनवण्याचे काम या कंपनीकडून केले जाते. या कंपनीचे मुख्यालय असून चेन्नई येथे असून या कंपनीचे पूर्वीचे नाव TI सायकल्स ऑफ इंडिया असे होते. गेल्या काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स चांगलेच वधारले आहेत. त्यामुळे या कंपनी शेअर्स विकत घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातोय. सध्या या कंपनीचे शेअरमुल्य १७९८.९५ असून पुढच्या काही दिवसांत हे मुल्य वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२००८ सालापर्यंत ही कंपनी मिड कॅप कंपनी होती. तेव्हा या कंपनीचे बाजारमूल्य ३४६५३.२३ कोटी होती. मात्र कालांतराने या कंपनीने चांगली प्रगती केली आणि बाजारमुल्यात चांगलीच वाढ झाली.
सप्टेंबरमध्ये जाहीर झालेल्या तिमाहित या कंपनीची जवळपास ३३.५० टक्के नफ्यात वाढ झाली असून ३२८८.०५ कोटींचा नफा झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या तिमाहित या कंपनीचा मुळ नफा २०१.६७ टक्के नोंदवला गेला आहे.