टाटा मोटर्सच्या शेअर्सवर तज्ज्ञांचे लक्ष; गुंतवणुकीची चांगली संधी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून बाजारात अस्थिरता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या घडामोडींचा आशियाई बाजारात परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक भारतीय गुंतवणूकदारांचे अनेक नुकसान झाले आहे. त्यातच आता टाटा ग्रुपच्या शेअर्सकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीची चांगली संधी उपलब्ध होत आहे.

शेअर मार्केटमधील किंग राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्येही टाटा मोटर्सच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला जातोय.

टाटा मोटर्सची उपकंपनी जेएलआरने NVIDIA सोबत करार केला आहे. या करारामुळे ग्राहकांना नेक्स्ट-जनरेशन ऑटोमेटेड ड्रायविंग सिस्टिम आणि AI- enabled सर्विस देण्यात येणार आहे. यामध्ये सेफ्टी, ऑटोमेटेड ड्रायविंग आणि पार्किंग, ड्रायवर आणि occupant मॉनिटरिंगसारख्या सुविधा सामिल होणार आहेत.

सध्या या शेअर्सची किंमत ४९८.७० रुपये आहे. मात्र तज्ज्ञांनी ६३० रुपये लक्ष्य केले आहे. म्हणजेच सध्याच्या किंमतीवरून ३० टक्क्यांची परतावा अपेक्षित आहे.