Home / अर्थ मित्र / ह्युंदाईपेक्षा अधिक विक्री होऊनही टाटा मोटर्सच्या तिसऱ्या तिमाहीत तूट

ह्युंदाईपेक्षा अधिक विक्री होऊनही टाटा मोटर्सच्या तिसऱ्या तिमाहीत तूट

टाटा मोटर्सच्या कार विक्रीत मोठी वाढ झाली असली तरीही कंपनीला तिसऱ्या तिमाहीत 1451.05 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर...

टाटा मोटर्सच्या कार विक्रीत मोठी वाढ झाली असली तरीही कंपनीला तिसऱ्या तिमाहीत 1451.05 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबर महिन्यात ह्युंदाई कंपनीला मागे टाकत टाटा मोटर्सने दुसरा क्रमांक पटकावला होता तर जानेवारीतही टाटा मोटर्सच्या अनेक गाड्या विकल्या गेल्या. मात्र तरीही ही कंपनी सध्या तोट्यात आहे.

टाटा मोटर्सने डिसेंबर 2020 च्या तिसऱ्या तिमाहीत 75,653.79 कोटींचा महसूल मिळवला होता. यातून त्यांना 2,941.48 कोटींचा केवळ नफा मिळाला. मात्र डिसेंबर 2021 मध्ये त्यांनी 72,229.29 कोटींचा महसूल कमवला आहे. त्यामुळे गाड्यांची भरघोस विक्री होऊनही यंदाच्या तिसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सला 1,451.05 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

काय आहेत तोट्याची कारणे?

जग्वार लँड रोव्हरने यंदा विक्रीत ३७.६ टक्के घट नोंदवली आहे. मात्र याचे उत्पादन ४१ टक्क्यांनी वाढले. त्यामुळे तिसऱ्या तिमाहीत तूट झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळेही तोटा झाल्याचे म्हंटले जात आहे.

दरम्यान, \’ कमतरता 2022 पर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे, परंतु पुरवठा हळूहळू सुधारणे अपेक्षित आहे. चिप संकटाचा फटका या वर्षीही उद्योगाला बसू शकतो,\” असं टाटा मोटर्स कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तसेच जग्वार चौथ्या तिमाहीत चांगली कमाई करेल अशी आशाही व्यक्त केली आहे.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या