गेल्या काही वर्षांपासून म्यूचुअल फंड SIP गुंतवणूकधारकांची पहिली पसंती ठरली आहे. त्यामुळे यामध्ये अनेकजण गुंतवणूक करत असतात. मात्र यात गुंतवणूक नेमकी कशी करावी? किती रुपयांची करावी याचे मार्गदर्शन मिळत नाही. मात्र तज्ञांच्या सल्ल्यानुसार जर तरुणांनी दिवसाला १०० रुपये बाजूला करून महिन्याला ३००० ची SIP सुरू केल्यास त्यांना वयाच्या पन्नाशी पर्यंत कोट्यवधी रुपये मिळतील.
वयाच्या २१ वर्षांपासून रोज १००-१०० रुपयांची बचत केल्यास महिन्याला ३००० रुपयांची बचत होईल. हे ३००० रुपये तुम्ही SIP मध्ये गुंतवू शकता. यात तुम्हाला अंदाजे वर्षाला १२ टक्के रिटर्न मिळतील. दिर्घकाळामध्ये SIP मध्ये चक्रवाढीचा फायदा मिळतो. जर तुम्ही पुढील ३० वर्ष म्हणजे वयाच्या पन्नाशीपर्यंत गुंतवणूक करू शकला तर १.१ करोड रुपये फंड तयार होईल. तुम्हाला एकुण गुंतवणूक १०.८ लाख रुपये असेल, त्यात तुम्हाला ९५.१ लाखांचा फायदा होऊ शकेल.
सुरक्षित आणि जास्त रकमेच्या गुंतवणुकीसाठी SIP चांगला पर्याय आहे. यातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असले तरीही नियोजनपूर्वक आणि योग्य मार्गदर्शनाखाली गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो. डिसेंबर २०२१ मध्ये ११०३०५ कोटी रुपये SIP कंट्रीब्यूशन रिकॉर्ड झाले होते.
टीप: वर दिलेली माहिती केवळ महितीपोटी दिली असून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.