इंडसइंड बँकेचे सीईओ सुमंत कथपालिया यांचा तडकाफडकी राजीनामा, व्यवहारातील अनियमिततेमुळे घेतला निर्णय

IndusInd Bank CEO Sumant Kathpalia Resigns

IndusInd Bank CEO Sumant Kathpalia Resigns | इंडसइंड बँकेचे (IndusInd Bank) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत कथपालिया (Sumant Kathpalia Resigns) यांनी आपल्या पदांचा तातडीने राजीनामा दिला आहे. डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलिओतील संभाव्य लेखा अनियमिततेच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर तातडीने राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या एक दिवस आधीच उपव्यवस्थापकीय संचालक अरुण खुराना यांनीही पदत्याग केला होता.

राजीनामा पत्रात कथपालिया यांनी म्हटले, “चालू असलेल्या डेरिव्हेटिव्ह प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मी बँकेच्या सेवेतून राजीनामा देत आहे. माझ्या कृतींसाठी नैतिक जबाबदारी स्वीकारतो.” कथपालिया मागील 5 वर्षांपासून बँकेचे नेतृत्व करत होते.

दरम्यान, बँकेने स्पष्ट केले की, बँकिंग नियमन अधिनियम 1949 च्या कलम 10बी(9) अंतर्गत, नव्या CEO ची नियुक्ती होईपर्यंत बँकेच्या दैनंदिन कामकाजासाठी ‘कार्यकारी समिती’ (committee of executives) स्थापन करण्यात येणार आहे.

बँकेने नियामक निवेदनात सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ही तात्पुरती कार्यकारी समिती स्थापन करण्यास 29 एप्रिल 2025 रोजी मान्यता दिली आहे. ही व्यवस्था नवीन MD&CEO रुजू होईपर्यंत किंवा मावळत्या CEO चा कार्यकाळ संपल्यानंतर 3 महिन्यांपर्यंत, यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत लागू राहील.

या अंतरिम समितीत सौमित्र सेन (मुख्य – ग्राहक बँकिंग) आणि अनिल राव (मुख्य प्रशासकीय अधिकारी) यांचा समावेश असून, ते दोघेही मंडळाच्या देखरेखीखाली बँकेचे दैनंदिन संचालन पाहतील. देखरेख समितीचे नेतृत्व संचालक मंडळाचे अध्यक्ष करणार असून, त्यात लेखापरीक्षण, भरपाई, नामांकन आणि जोखीम व्यवस्थापन समित्यांचे प्रमुखही असतील.

इंडसइंड बँकेने स्पष्ट केले की, “व्यवसायातील सातत्य आणि प्रशासन मानके टिकवून ठेवण्यासाठी बँक आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.”

Share:

More Posts