३० रुपयाच्या एका शेअरने २२ वर्षात तब्बल ७४ हजार टक्के परतावा दिला आहे. श्री सिमेंटचा हा शेअर असून ज्या गुंतवणूकदारांनी वीस वर्ष संयम ठेवला ते गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.
श्री सिमेंटचा सध्याचा बाजारभाव रु 22492.55 असून पुढील एका वर्षात हा स्टॉक 29700 रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. श्री सिमेंट्स लिमिटेड ही सिमेंट क्षेत्रात कार्यरत आहे आणि ती 1979 सालची लार्ज कॅप कंपनी आहे. श्री सिमेंटचा कमाल परतावा 74,000 टक्क्यांहून अधिक आहे.
या कंपनीचे शेअर 30 जुलै 2001 रोजी एनएसईवर 30.30 रुपयांच्या पातळीवर होते आणि आता त्याची किंमत 22,550 रुपयांवर पोहोचली आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरनी 74,322.44 टक्के मजबूत परतावा दिला आहे. त्यानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 22 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 7.44 कोटी रुपये झाली असती.