पिझ्झा आणि केएफसीचे आऊटलेट सांभाळणारी सफायर फूड्स लिमिटेड कंपनी ही भारतातील आणि श्रीलंकेतील महत्त्वाची कंपनी आहे. यम ब्रॅण्ड्सची सगळ्यात मोठी फ्रॅन्चायजी कंपनी आहे. यामध्ये समारा कॅपिटल, गोल्डमॅन सैश, सीएख्स पार्टनर्स आणि एडिलविसने गुंतवणूक केली आहे.
सफायर फूड्सची स्थापना २००९ मध्ये झाली होती. २०१५ साली ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सजेंचमध्ये लिस्ट झाली. तसेच, नोव्हेंबर २०२१ रोजी या कंपनीचा २ हजार ७३ कोटींचा आयपीओही आला होता.
३१ मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार या कंपनीचे २०४ केएफसी रेस्टॉरंट आहेत. तर, भारत, श्रीलंका आणि मालदीवमध्ये या कंपनीचे २३१ पिज्जा हट आहेत. तसेच, श्रीलंकातील दोन टॅको बेल रेस्तराँसुद्धा सफायर फुड्सकडेच आहेत.
या कंपनीच्या व्यवसायाबाबत बोलायचे झाल्यास नुकत्याच जाहीर झालेल्या डिसेंबर २०२१च्या तिमाहित या कंपनीने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या कंपनीचा मूळ नफा ३९.६३ कोटी झाला आहे. गेल्या काही दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसतेय. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी या कंपनीच्या शेअरची किंमत १२९५ आहे. येत्या दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.