Home / अर्थ मित्र / बाबा रामदेव यांच्या रुची सोयाचा FPO येणार

बाबा रामदेव यांच्या रुची सोयाचा FPO येणार

योगगुरू बाबा रामदेव यांच्या रुची सोया या खाद्यतेल कंपनीचा FPO येणार आहे. यासाठी कंपनीने ६१५-६५० रुपये प्रति शेअर किंमत ठरवली...

योगगुरू बाबा रामदेव यांच्या रुची सोया या खाद्यतेल कंपनीचा FPO येणार आहे. यासाठी कंपनीने ६१५-६५० रुपये प्रति शेअर किंमत ठरवली असून त्याची फ्लोअर प्राईस ६१५ रुपये असेल. तर कॅप प्राईस ६५० रुपये असेल.

या FPO मधून 4300 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना असून कंपनी 24 मार्च रोजी फॉलो ऑन पब्लिक ऑफर खुली करणार आहे. तसेच, हा FPO 28 मार्च रोजी बंद होईल.

शेअर लॉट २१ शेअर्सचा असणार तर २१ इक्विटी शेअर्सचा गुणाकार असेल. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) नुसार, 5 एप्रिल रोजी शेअर्स जमा केले जातील आणि एक दिवसानंतर ट्रेडिंग सुरू होईल. तर रिफंड 4 एप्रिलपासून सुरू होईल.

कंपनीविषयी माहिती

योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने 2019 मध्ये रुची सोया विकत घेतले. ४३५० कोटी रुपयांना या दिवाळखोर कंपनीला पतंजलीने खरेदी केले. कंपनीच्या प्रमोटर्सकडे सध्या या कंपनीचा 99 टक्के हिस्सा असून FPO च्या या फेरीत कंपनीला किमान 9 टक्के हिस्सा विकावा लागेल.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या