रियलमीने भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन सीरिज लाँच केली आहे. कंपनीने रियलमी 14 प्रो 5G आणि रियलमी 14 प्रो+ 5G स्मार्टफोन्स बाजारात लाँच केले आहेत. या स्मार्टफोन सीरिजमध्ये 60 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. रियलमी 14 प्रो+ मध्ये Snapdragon 7s Gen 3 चिपसेट आणि रियलमी 14 प्रो मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy 5G चिपसेट देण्यात आली आहे.
Realme 14 Pro 5G आणि Realme 14 Pro+ 5G ची किंमत
रियलमी 14 प्रो 5G च्या 8GB+128GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये, तर 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. हा फोन जयपूर पिंक, पर्ल व्हाइट आणि स्यूड ग्रे अशा रंगा येतो. तसेच, Realme 14 Pro+ 5G च्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आणि 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये व 12GB+256GB स्टोरेज मॉडेल 34,999 रुपयात उपलब्ध आहे. फोनची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून 23 जानेवारीपासून होईल.
Realme 14 Pro+ 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme 14 Pro+ 5G फोन अँड्रॉइड 15 वर आधारित Realme UI 6.0 वर काम करतो. यामध्ये आणि 6.83-इंच 1.5K (1,272×2,800 पिक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, जो 120Hz रिफ्रेश रेट, 3840Hz PWM डिमिंग आणि 1500nits पीक ब्राइटनेससह येतो. डिस्प्लेवर Corning Gorilla Glass 7i चे प्रोटेक्शन दिले आहे. तसेच, Snapdragon 7S Gen 3 चिपसेटसह 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळेल.
रियलमी 14 प्रो+ मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50-मेगापिक्सचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सल Sony IMX896 अल्ट्रा-वाइड शूटर आणि 50-मेगापिक्सल Sony IMX882 सेन्सर पेरिस्कोप कॅमेऱ्याचा समावेश आहे. तसेच, 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यामध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी मिळेल.
Realme 14 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme 14 Pro 5G मध्ये 6.77-इंच AMOLED डिस्प्ले दिला असून, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेसपर्यंत सपोर्ट करतो. हँडसेटवर Corning Gorilla Glass 7i चे प्रोटेक्शन मिळेल. याशिवाय, MediaTek Dimensity 7300 Energy 5G चिपसेट सह 8GB RAM आणि 256GB स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे.
रियलमीच्या या फोनमध्ये रियरला 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. यात 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 6,000mAh ची बॅटरी मिळेल.