कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आता पेन्शन देण्यासाठी पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) नंबर अनिवार्य केला आहे. तसेच, PPO नंबर नसलेल्या पेन्शनवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तुमचा पीपीओ क्रमांकग हरवला असेल किंवा तुम्ही विसरला असाल तर तो पुन्हा मिळवण्याकरता खूप सोपा मार्ग आहे. PPO नंबर हा EPFO द्वारे कर्मचाऱ्याला त्याच्या रिटायरमेंटनंतर जारी केलेला एक युनिक नंबर असतो.
निवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून १२ अंकी पीपीओ नंबर दिला जातो. हा नंबर तुम्ही तुमच्या बँक खाते क्रमांक किंवा PF नंबरच्या मदतीने तो पुन्हा मिळवू शकता. हे काम तुम्ही घरबसल्या ऑनलाईन करू शकता.
यासाठी तुम्ही ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. पेन्शनर्स पोर्टल उघडून पुढील स्टेप वर जा आणि डॅशबोर्डवरील Know Your PPO नंबर वर क्लिक करा. तुमचा रजिस्टर्ड बँक खाते क्रमांक किंवा PF क्रमांक एंटर करा. तुम्ही सबमिट करताच, तुमचा PPO नंबर स्क्रीनवर दिसेल.
पेन्शन खाते बँकेच्या एका शाखेतून दुसर्या शाखेत ट्रांसफर करण्यासाठी तुम्हाला PPO नंबर देखील आवश्यक आहे. याशिवाय लाईफ सर्टिफिकेट सादर करताना PPO नंबर द्यावा लागतो. एवढेच नाही तर पेन्शनसंबंधी तक्रारी नोंदवण्यासाठी किंवा पेन्शनचे स्टेट्स ऑनलाइन जाणून घेण्यासाठीही हा नंबर खूप उपयुक्त आहे.