SBI मध्ये तुमचे थकित कर्ज आहे? बँकेने आणलीय जबरदस्त ऑफर

बँक ऑफ इंडियामधून तुम्ही कर्ज घेतले आणि ते फेडण्यास तुम्ही असमर्थ ठरला असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी बँकेने आणली आहे. कर्ज न फेडल्यामुळे तुमचं अकाउंट NPA मध्ये गेले असल्यास तुम्ही या संधीचा फायदा उठवू शकता. बँकेने ग्राहकांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना आणली आहे. याद्वारे तुम्ही कर्जाच्या रकमेची परतफेड करून NPA खाते बंद करू शकता.

NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग अॅसेट्स. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल आणि ते फेडण्यास असमर्थ ठरले असल्यास तुमचे कर्ज खाते NPA केले जाते. तुमचे खाते NPA मध्ये समाविष्ट झाल्यास तुम्हाला इतर दुसरी कोणतीच बँक कर्ज देत नाही. त्यामुळे तुमचे खातेही NPA मध्ये गेले असेल तर तुमच्यासाठी SBI ने चांगली योजना आणली आहे.

या योजनेची बँक ऑफ इंडियाने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. कर्ज असलेले खातेदार त्यांच्या बँकेच्या शाखेत जाऊन एनपीए खात्याच्या सेटलमेंटच्या वन-टाइम सेटलमेंट योजनेंतर्गत सूटचा लाभ घेऊ शकतात.

बँक ऑफ इंडियाने एनपीए ग्राहकांसाठी शाखा न्यायालय स्थापन केले आहे. बँक ऑफ इंडिया कर्ज डिफॉल्टरच्या प्रॉपर्टीचा लिलाव करते. यातून थकित कर्ज वसूल केले जाते. त्यामुळे वन टाइम सेटलमेंट (OTS) योजनेचा फायदा घ्या आणि तुमचे थकीत कर्ज संपवून एनपीए खाते बंद करुन टाका.

Scroll to Top