फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल यांची कंपनी \’नावी टेक्नॉलॉजीज\’ने आयपीओसाठी सेबीकडे अर्ज पाठवला आहे. कंपनी इश्यूमधून 3350 कोटी रुपये उभारणार आहे.
सचिन बन्सल यांनी Navigator या इंग्रजी शब्दावरून Navi हे नाव घेतले आहे. त्यांची या कंपनीत ९७ टक्के हिस्सेदारी आहे.
नावीच्या DRHP नुसार, कंपनी इश्यूमधून मिळालेली रक्कम तिच्या उपकंपन्या Navi Finserve Pvt Ltd आणि Navi General Insurance Ltd यांना भांडवल पुरवण्यासाठी वापरणार आहे.
नावी यांनी सिरिल अमरचंद मंगलदास आणि इंडस लॉ यांना या इश्यूसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. तसेच Axis Capital, BofA Securities, ICICI Securities, Edelweiss Financial Services आणि Credit Suisse Investment Bank यांचा नावी टेक आयपीओमध्ये सहभाग असेल.
नावीच्या ॲक्टिव्ह यूजर्सची संख्या सुमारे 30 लाख आहे. फेब्रुवारीमध्ये सुमारे 500 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. सध्या, नावीच्या व्यवसायात वैयक्तिक आणि गृह कर्ज प्लॅटफॉर्म, म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म, आरोग्य विमा आणि मायक्रो फायनान्स व्यवसायांचा समावेश आहे.
बन्सल यांनी नवीमध्ये 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आयपीओनंतरही कंपनीत त्यांची सर्वाधिक भागीदारी कायम राहील, असा अंदाज आहे.