IPPB खातेधारकांनो केवायसी पूर्ण करा, अन्यथा बसेल दंड

मुंबई – इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे डिजिटल बचत खात्याची तुम्ही सुविधा घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. तुम्ही तुमची केवायसी अद्ययावत केली नसेल तर तुमचं खातं बंद होऊ शकतं तसेच हे खाते बंद झाल्यास तुम्हाला जीएसटीसह १५० रुपये दंड लागू शकतो. हा नियम ५ मार्चपासून लागू होणार आहे, त्यामुळे त्वरीत केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, . ‘आयपीपीबी’च्या मते, केवायसी (KYC) अपडेट न केल्यामुळे वर्षभरानंतर डिजिटल बचत खाते बंद झाले तरच दंडाचा दणका बसेल. मात्र खाते बंद करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. टपाल खात्याच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने अल्पावधीतच जनसामान्यांच्या मनात मोठी लोकप्रियता मिळवली आहे. पण खाते बंद झाल्यास ग्राहकाला दंडाचा भूर्दंड सोसावा लागेल.

१८ वर्ष पूर्ण केलेले आणि ओळखपत्र असलेले कोणीही हे डिजिटल बचत खाते उघडू शकते. खातेदाराला 12 महिन्यांच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. केवायसीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर डिजिटल बचत खाते नियमित बचत खात्यात अपडेट केले जाईल. या खात्यात जास्तीत जास्त दोन लाख रुपये जमा करता येतात. ते उघडल्यानंतर 12 महिन्यांच्या आत केवायसी पूर्ण न झाल्यास, खाते बंद होईल. 2 महिन्यांत केवायसी पूर्ण केल्यानंतर डिजिटल बचत खाते पोस्ट ऑफिस बचत खात्याशी (POSA) संलग्न करता येईल.

Scroll to Top