बँका संदर्भातील तक्रारी ग्राहकांनी तिसऱ्या पक्षाकडे कराव्यात, या तक्रारींचे निवारण शुल्कासहीत किंवा विनाशुल्क होईल अशा प्रकारच्या अफवा समाजमाध्यांवर पसरवल्या जात आहे. इंटिग्रेटेड ओम्बेस्डम स्कीम 2021 अशा कोणत्याही प्रकारची योजना रिझर्व्ह बँकेकडून राबवली जात नसून यावर विश्वास न ठेवण्याच आवाहन आरबीआयने केले आहे.
इंटिग्रेटेड ओम्बेस्डम स्कीम 2021 अशा प्रकारची योजनेची माहिती समाजमाध्यमावर पसरवली जात असल्याची तक्रार काही ग्राहकांनी आरबीआयकडे केली होती. याची दखल घेत आरबीआयने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
ग्राहकांच्या कोणत्याही तक्रारींचे निवारण करण्यासाठी रिझर्व्ब बँकेची स्वतःची यंत्रणा आहे. यासाठी शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना कोणत्याही तक्रारी आल्यास त्यांनी थेट रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थेकडे दाद मागावी असे आरबीआयने म्हटलं आहे. तसेच, रिझर्व्ह बॅंकेत कुठल्या व्यवस्थेकडे तक्रार करायची याचा संपूर्ण तपशील रिझर्व बॅंकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.