नवी दिल्ली – डबघाईला आलेल्या एअर इंडियाचे केंद्र सरकाने खासगीकरण केले. आर्थिक चणचण असलेल्या एअर इंडियाला विकत घेण्यासाठी टाटांनी यशस्वी बोली लावली. आता केंद्र सरकार IDBI बँकेच्या खासगीकरणाचा विचार करत आहे.
या महिन्यातच खासगीकरणाची सुरुवात होणार असल्याने सरकारी सल्लागार खरेदीदारांशी संपर्क साधत आहेत. निवडलेल्या खरेदीदारांना पुढच्या आठवड्यात रोड शो साठी बोलवण्याची शक्यता असल्याचे म्हंटले जात आहे.
एलआयसीचा (LIC)आयडीबीआय बँकेत 49.24% मालकी हिस्सा आहे. तर सरकारचा 45.48% आणि नॉन-प्रमोटरकडे 5.29% हिस्सा आहे. सध्या सरकार बँकेतील आपली संपूर्ण ९४.७१ टक्के हिस्सेदारी विकण्यास तयार आहे. आयडीबीआय बँकेची विक्री ही खुल्या बोली प्रक्रियेअंतर्गत होणार आहे.