ICICI बँकेच्या ग्राहकांच्या खिशाला आता आणखी भुर्दंड बसणार आहे. कारण बँकेने १० फेब्रुवारीपासून विविध सेवांचे शुल्क वाढवले आहेत.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार लेट पेमेंट शुल्कात वाढ करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच १० फेब्रुवारीपासून या शुल्काची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच, तुमचा चेक परत गेला तर बँक संपूर्ण Due Amount वर 2 टक्के दराने शुल्क वसूल करणार आहे. यासाठी बँक कमीत कमी 500 रुपये वसूल करणार आहे. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल तर, तुमच्या खिशाला चटका बसणार आहे.
याशिवाय इतर बँका 10,001 ते 25000 दरम्यानच्या पेमेंटवर Due आहे. तर यावर तुम्हाला 900 रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. तसेच 25001 ते 50000 रुपयांपर्यंतच्या Due पेमेंटवर तुम्हाला 1000 रुपयांचे शुल्क आकारण्यात येते.